बाणेर येथील बाबुराव सायकर चौकातील नागरिकांसाठी अडचणीचे ठरणारे सुशोभीकरण त्वरित न काढल्यास जीवन चाकणकर यांचा आंदोलनाचा इशारा

औंध : बाणेर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जीवन चाकणकर यांच्या वतीने कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना बाणेर येथील बाबुराव सायकर चौकातील अडचणीचे ठरणारे जी -२० च्या निमित्ताने केलेले सुशोभीकरण त्वरित काढावे अन्यथा प्रखर आंदोलन उभे करू असा इशारा काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन देण्यात आला.

बाणेर येथील बाबुराव सायकर चौकामध्ये जी-२० साठी केलेले सुशोभीकरण हे वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. या भागात पुणे मेट्रोचे काम चालू आहे नागरिक व पादाचारी वर्गास या गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या परिसरात सकाळी व दुपारी शाळेच्या बसेस व इतर वाहने यांना वळण घेण्यासाठी खूपच मेहनत करावी लागते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी वारंवार याबाबत तक्रारी केलेल्या असून वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. याची दखल काँग्रेस पक्षाने घेतली असून महापालिकेने त्वरित लक्ष घालत नको असलेले सुशोभीकरण काढण्याबाबत कारवाई केली नाही तर बाणेर बालेवाडी काँग्रेसच्या वतीने प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आहे : सदैव आपलाच जीवन निवृत्ती चाकणकर (उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी)

यावेळी श्रीनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण सायकर, दयानंद चाकणकर उपस्थित होते.

See also  सुसगाव येथे सुस-महाळुंगे बॉर्डर सोसायटीज असोसिएशनच्या कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे यांचा नागरिकांशी संवाद