औंध येथे फुलोरा फाउंडेशन तर्फे शालेय साहित्याचे वाटप

औंध : फुलोरा फाउंडेशन तर्फे या वर्षी देखील शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यंदा औंध येथील इंदिरा गांधी शाळा, गोळवलकर गुरुजी इंग्रजी माध्यम शाळा, खडकी येथील आलेगावकर शाळा , श्रीमती गुलुबाई मुळुक झरानी कन्या शाळा आणि गोखले नगर येथील गोपाळकृष्ण शाळेत वह्या तसेच पेन आणि पेन्सिल्स यांचे वाटप करण्यात आले.

पाच शाळेतील ९७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक सनी निम्हण यांचे कडून वह्यांच्या स्वरूपात काही मदत मिळाली अशी माहिती फुलोरा फाउंडेशनच्या विश्वस्त प्रिती शिरोडे यांनी दिली. गेली दहा वर्षे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला फुलोरा तर्फे शालेय साहित्याचे वाटप केले जाते. पहिल्या वर्षी एका शाळेपासून आणि साधारणतः शंभरएक विद्यार्थ्यांना सुरू केलेल्या मदतीपासून आज पाच शाळा आणि जवळजवळ एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत फुलोरचे कार्य विस्तारले आहे. मागील वर्षी शालेय साहित्याबरोबर कोथरूड येथील एका कन्या शाळेतील गरजू विद्यार्थिनींची फी भरण्यास देखील फुलोरा फाउंडेशनने मदत केली होती. यावेळी देवराज लिगाडे, विश्वस्त प्रिती शिरोडे, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

See also  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज