सुस : बाणेर
सुस
हद्दीवरील यशविन जिवन, ॲार्किड सोसायटी, यश्विन आनंद, निलांचल, सारथी सोविणार, माय नेस्ट, संजिवन या सोसायटीतील नाग
रिकांनी या
भागातील विबग्योर स्कुलच्या परिसरात सकाळी व सायंकाळी विद्यार्थांना ने-आण करणार्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याची तक्रार
नागरिक करत होते.
यावर उपाययोजना करण्यासाठी व या परिसरातील नागरीकांना वाहतुक कोंडीतुन मुक्त करण्यासाठी
माजी नगरसेवक अमोल बालवडकर ,वाहतुक पोलिस निरीक्षक गणेश पवार व त्यांच्या सर्व अधिकारी वर्ग तसेच
शशिकांत बालवडकर
यांनी विबग्योर स्कुल येथे प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका
प्रियदर्शनी माने व मॅनेजमेंन्ट ॲडमिन श्री.मंगेश यांच्याशी भेटुन वाहतुक कोंडी
कमी करण्यासाठी काय ठोस उपाययोजना करण्यात येईल यावर सविस्तर चर्चा क
रण्यात आली. सदर शाळेच्या ड्राईव्ह वे ची पाहणी करुन विद्यार्थांना रस्त्यावर वाहने उभी करुन ने-आण करण्याऐवजी शाळेच्या आतील ड्राईव्ह वे द्वारे आतमध्येच सोडणे व घेणे शक्य आहे असे दिसुन आले.
त्याप्रमाणे ड्राईव्ह वे चा वापर करुन या रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याबाबत शालेय प्रशासनास सांगितले आहे. त्यावर हि उपाययोजना लवकरच आमलात आणली जाईल असे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माने मॅडम यांनी आश्वासित केले आहे. शाळेच्या समोरील मुख्य रस्त्यावर लवकरच गतिरोधक देखिल बसवण्यात येणार आहे. त्यासंबंधीची योजना देखिल करण्यात आलेली आहे. सदर उपाययोजनेची अंमलबजावणी पुढील ५-६ दिवसांमध्ये करुन या परिसरातील सर्व नागरीकांची होणार्या वाहतुक कोंडीमधुन निश्चितच लवकरच सुटका करण्यात येईल
असे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.