पुणे: हवेली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची करण्यात घोषणा करण्यात आली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रणधुमाळी चालू असून या बाजार समितीच्या निवडणूक केंद्रांच्या ठिकाणांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली.
या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदारसंघ निहाय मतदान केंद्र जाहीर झाली असून एकूण १८ जागांसाठी १७ हजार ८१२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक सेवा सहकारी संस्था गटातून ११ उमेदवार निवडून द्यायचे असून याबरोबर ग्रामपंचायत गटातून ४, व्यापारी आडते गटातून २ आणि हमाल मापाडी गटातून १ उमेदवार विजयी होणार आहे.
व्यापारी गटात या दोन्ही पॅनलने कोणालाही पाठिंबा दिला नसल्याने या ठिकाणी दोन दोन उमेदवारांनी एकत्र येत पॅनल बनवला आहे. या मतदानासाठी सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदानासाठी – श्री संदीप माणिकराव सातव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अरण्येश्वर तळजाई रोड, व्यापारी आडते -शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कूल, हमाल तोलणार – मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत भवन या ठिकाणी मतदान केंद्र असणार आहे.