आम आदमी पक्षातर्फे झाडांची कत्तल रोखण्यासाठी हरित लवादाकडे तक्रार दाखल

पुणे – बावधनमधील आम आदमी पक्षाचे सदस्य ॲड.कृणाल घारे यांनी बावधनमधील 89 झाडांची तोड वाचवण्यासाठी NGT ( राष्ट्रीय हरित लावाद) मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वृक्षतोड धोरणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

एकीकडे महाराष्ट्र शासनातर्फे पर्यावरणाच्या रक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून झाडे लावली जातात तर दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून अशाप्रकारे झाडांची कत्तल होत आहे. ही झाडे तोडण्याची पीएमसीची योजना शाश्वत विकासाच्या तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे. प्राथमिक दृष्ट्या सार्वजनिक हिताच्या नावाखाली एका खाजगी व्यक्तींचा फायदा करण्याचा महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हेतू दिसतो आहे असे मत ॲड. कुणाल घारे यांनी व्यक्त केले.

आम आदमी पक्ष हा नेहमीच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आग्रही राहील तसेच गरज पडल्यास कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊन महापालिकेला आव्हान देईल अशी भूमिका यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी मांडली आणि शहरातील पर्यावरण प्रेमींना अशा गोष्टी विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

See also  आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त हर्बायुतर्फे शनिवारी हर्बायु योग प्रभात अंतर्गत मोफत ऑनलाईन विशेष कार्यक्रम