ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र ताम्हाणे यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान

बाणेर : बालगंधर्व रंगमंदिराच्यां 57 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र ताम्हाणे उर्फ गुजाभाऊ यांना ‘लोककलावंत’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेली अनेक वर्ष गुजाभाऊ ताम्हणे यांनी लोककलावंत म्हणून काम करीत असताना अनेक लोकनाट्य, वगनाट्य, पोवाडे बतावणी या लोककला प्रकारांबरोबरच चित्रपट, मालिका, वेबसिरीज पथनाट्य या कलाप्रकाराच्यां माध्यमातून मराठी सिने रसिकांचे मनोरंजन केले आहेआहे. मनोरंजनासोबतच सामाजिक कार्याचे भान राखीत आज मितीला महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भिमा तूझ्या जन्मामुळे, रायबा हेच का आपले स्वराज्य, या महानाट्यातून खलनायिका भूमिका त्याचप्रमाणे सोशल मीडियावर गाजत असणाऱ्या चांडाळ चौकडी, जावई जोरात, हास्याचा धिंगाणा  या वेब सिरीज मधील त्यांच्या भूमिका महाराष्ट्रभर गाजत आहे.

अनेक वर्षांपासून लोकरंजनातून लोक सेवा करत लोकजागृती पर काम करणाऱ्या या हरहुन्नरी अवलियाला आजवर अनेक  नाट्य पूरस्काराने सन्मानित केले आहे.

कलाकारांसाठी मानाचा आणि प्रतिष्ठेचा असणारा हा पुरस्कार अखिल भारतीय चित्रपट महामंडाळ आणि बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मा.मेघराज राजे भोसले, आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, यांच्या हस्ते ताम्हाणे यांना प्रदान करण्यात आला  प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रा. प्रकाशकुमार वाघमारे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. याशिवाय सिने अभिनेते मुबीन तांबोळी, दीपक कुदळे हे ही उपस्थित होते.

See also  वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे