परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यूच्या निषेधार्थ रमेश ठोसर यांच्या नेतृत्वाखाली औंध मध्ये निदर्शने आंदोलन

औंध : परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाली होती त्या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन केले होते या मध्ये पोलिसांनी भिमसैनिक.सोमनाथ सूर्यवंशी आंदोलक यांना पोलिसांनी पकडून पोलिस कोठडीत ठेवले होते. सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडी मृत्यू झाला.या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ औंध डि.पी.रोड. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये रमेश ठोसर नेते रि.पा.इं पुणे शहर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले .    प्रमुख मागण्या आंदोलना मार्फत चतुरशिंगी पोलिस स्टेशनच्या क्राईम पी.आय.अशिविनी नाईकनवरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

परभणी पोलिस कोबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. परभणी पोलिस निरीक्षक.अशोक घोरबांड सह इतर पोलिस अधिकारी यांच्यावर ३२अन्वये ॲटरोशिटी कायद्या अन्वये कलम.३(१) आणि ३(२) प्रमाणे गुन्हे दाखल करावे.सोबतच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत घ्यावे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला ५०लाखाची मदत सरकारने तातडीने देण्यात यावी.वच्छला मानवत या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने.३५४ ,३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करून संबंधित पोलिसांना निलंबित करावे. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनाला रि.पा.इं पुणे शहर नेते.संजय कांबळे, रवि भालेराव, स्वप्निल पालके, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप गायकवाड, हिराबाई घोडेराव, छायाताई ठोसर, रुपाली राक्षे, इत्यादी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते .

See also  पर्यावरणाचे रक्षण -पर्यावरण मित्र  रामदास मारणे यांचा लेख