कोथरूड मिसिंग लिंक बाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आयुक्तांकडून आढावा

कोथरूड  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मिसिंग लिंकबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर कुमार आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.

बैठकीदरम्यान प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, जमीन संपादन, वाहतूक नियोजन आणि निधीवाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सदर काम पावसाळ्यापूर्वी जलदगतीने कालबद्ध पूर्ण करावे, अशा सूचना कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, भूसंपादन आणि मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे आदी उपस्थित होते.

See also  लोणावळा येथील पर्यटन विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार