मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू चौक येथे लाक्षणिक उपोषण तर औंध बाणेर बालेवाडी पाषाण परिसरात बंद

पुणे : मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर यांच्या वतीने गुरुवार दिनांक 14/ 9/ 2023 रोजी हुतात्मा बाबू गेनू चौक लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना येथील आंदोलनाला पाठिंबा तसेच मराठा समाजाच्या न्याय मागण्या मांडण्या साठी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे शहरातील सर्व मराठा बांधवांना उपोषण स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. औंध बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी सुस महाळुंगे परिसरात देखील मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात येणार आहे. तसेच बालेवाडी फाटा येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील करण्यात येणार आहे.

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्या वतीने यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

See also  मणिपूर मध्ये झालेली घटनांच्या निषेधार्थ बीएसएनएल ऑफिस मध्ये बी.एस.एन. एल. एम्प्लाईज युनियन, आणि बी.एस.एन.एल. वर्कींग वुमैन को-आर्डीनैशन कमिटी आणि आल इंडिया बी.एस.एन.एल.DOT पेन्शनर्सर असोसिएशन निदर्शने.