कोथरूड, पुणे – थोरात गार्डन ग्रुप व सौ. मीनाताई ठाकरे विद्यानिकेतन क्रमांक ८, कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, डोळ्याच्या तपासणी शिबिर व छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या उपक्रमात रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट व आधार ब्लड सेंटर ट्रस्ट यांचे रक्तदानासाठी सहकार्य लाभले, तर आपुलकी संस्कृती संस्था यांच्यामार्फत मोफत डोळ्याच्या तपासणी शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन धनवे अण्णा तसेच सपकाळ मामा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी API रवींद्र आळेकर,मा. नगरसेवक पृथ्वीराज सुतार,किशोर शिंदे,अल्पनाताई वर्पे, नवनाथ जाधव, बाळासाहेब विचारे, महेश विचारे, संदीप मोकाटे आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात एकूण २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डोळ्याच्या तपासणी शिबिरात अनेक नागरिकांनी तपासणी करून घेतली व गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजन किरण रामचंद्र आढागळे व थोरात गार्डन ग्रुप यांनी केले.