बाणेर : समर्थ व्याख्यानमाला नववे सत्र शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता क्लब हाऊस कपिल अखिला बाणेर इथे सुमेधा चिथडे यांचे ” नेशन फर्स्ट, राष्ट्रीय स्वाहा ईदं न मम ” या विषयावर व्याख्यान झाले.
आपल्या भाषणात सुमेधा चिथडे यांनी सांगितले की, सैनिकांसाठी काम करताना गरजा आणि हाव यातील फरक कळले. जात, धर्म, वंश, पंथ, भाषा, या पलीकडे जाऊन काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सैन्यदल. सैनिक ठराविक वेळेत काम करत नाहीत एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून संपावर जात नाहीत स्वतः जगताना राष्ट्र प्रथम हा विचार घेऊन जगतात म्हणूनच स्वतःपलीकडे जगण्याची प्रेरणा सैनिक देतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
सुमेधा चिथडे म्हणाल्या आजही आमच्या राष्ट्रापुढे खूप आव्हाने आहेत भविष्यात आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपण पुढे येऊन राष्ट्र सेवेसाठी कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आजही आपल्याला अनेक सामाजिक समस्यांना सामना करावा लागत आहे भविष्यातील संघर्षाचा सामना करण्यासाठी आपल्या मुलांमध्ये शौर्य वृत्ती निर्माण केली पाहिजे तर ” दागिन्यांपेक्षा जवानांचे प्राण महत्त्वाचे! ” हा संदेश त्यांनी दिला.
आपल्या पावणे दोन तासांच्या भाषणात सियाचेन, कुपवाडा, कारगिल येथील भौगोलिक परिस्थितीच्या जवानांच्या चित्रफिती त्यांनी दाखवल्या खूप कठीण परिस्थितीत आमचे जवान देश रक्षणाचे कार्य करीत आहेत अंगावर शहारे आणणारे प्रसंग पाहून आमची मने सुन्न झाली. जिथे शब्द संपतात तिथे अश्रू सुरू होतात. अशीच आमची अवस्था झाली.
” राष्ट्र प्रथम ” या सामाजिक बांधिलकीतून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने भरीव अशी मदत राष्ट्रकार्यासाठी आम्ही समर्पित केली. सूमारे 200 जेष्ठ नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते
पाहुण्यांचा परिचय श्री दिलीप बोरकर यांनी करून दिला तसेच पाहुण्यांचा सत्कार श्री. अजय कदम ( सेवानिवृत्त ACP पुणे ) यांनी केला. कपिल अखिला सोसायटीचे चेअरमन श्रीयुत दिनेश कोठावदे, श्री रवींद्र मराठे हे नेहमीच कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवर जेष्ठ बंधू भगिनी उपस्थित होते.