औंध : औंध येथील परिवार चौकातील ओम सुपर मार्केट च्या समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.
औंध येथील परिहार चौक कडून औंध गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्यावर पाणी पाणी साठत आहे. परिवार चौकाकडून येणाऱ्या वेगवान वाहनांमुळे हे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जवळच स्वच्छतागृह असल्याने याचा वास देखील येत आहे यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालकांना देखील वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. परिहार चौकातील पोलीस वसाहतीसमोरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी अरविंद पाटील यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.