अण्णाभाऊ साठे शोषित पिढीचे प्रेरणास्त्रोत : राहुल डंबाळे

पुणे : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे  शोषित पीडित जनतेचे प्रेरणास्त्रोत असून त्यांच्या साहित्यातून व सामाजिक चळवळीच्या कार्यातून नाही रे वर्गाला संघटित होऊन डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचे बळ प्राप्त झाले असल्याचे मत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सारसबाग येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेचे आयोजित करण्यात आली होते यावेळी डंबाळे यांनी वरील मत व्यक्त केले.

याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील नागेश भोसले , सत्यवान गायकवाड,  सागर धाडवे ,  आनंद घरात,  रवीभाऊ आरडे,  प्रकाश वैराळ यांच्यासह पुणे शहर मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे व जयंती महोत्सव समितीच्या स्वागताध्यक्ष लक्ष्मीताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न