पुणे : बाणेर येथील एसटीपी प्लांट समोरील रस्त्यावरील चेंबरच्या उघड्या झाकणामुळे गाय चेंबर मध्ये पडली यावेळी औंध येथील प्राणिमित्र हेमंत शेळके व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाना वाळके यांनी तात्काळ पुढाकार घेत गाय नंबर मधून काढण्यासाठी प्रयत्न केला. पुणे महानगरपालिका अग्निशामक दल व क्रेन व जेसीबीच्या साह्याने चेंबर मध्ये अडकलेली गाय काढण्यात आली.
सकाळी ११ वाजता एसटीपी प्लांट समोरील औंध – बाणेर लिंक रोड वरील चेंबर मध्ये गाय पडली. पुणे महानगरपालिकेच्या गटारावरील झाकण तुटल्याने या ठिकाणी दुरुस्ती करण्याऐवजी ही जागा लोखंडी पत्रा टाकून झाकण्यात आली होती. यावरून गाय गेल्यानंतर पत्रा खचल्याने गाय चेंबर मध्ये पडली. यानंतर प्राणी मित्र व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते यांनी जेसीबी व अग्निशामक दलाच्या मदतीने गाय सुखरूपपणे बाहेर काढली
बाणेर औंध परिसरामध्ये निकृष्ट दर्जाची पावसाळी गटारांची झाकणे बसवण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे सातत्याने तुटत आहेत. वारंवार मागणी करून देखील वेळेवर दुरुस्ती केली जात नसल्यामुळे असे अपघात घडत आहेत. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नाना वाळके यांनी सांगितले.
बाणेर बालेवाडी परिसरातील पावसाळी गटारांची झाकणे व खड्ड्यांचे दुरुस्ती तातडीने करण्यात यावी मागणी यावेळी करण्यात आली.