सुतारवाडी पाषाण परिसरात चार दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिक त्रस्त

पाषाण : सुतारवाडी पाषाण परिसरामध्ये गेले चार दिवस पाणीपुरवठा झाला नसून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पाषाण सुतारवाडी परिसरातील पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असून याबाबत पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेले काही दिवस आणि पुरवठा बंद असून अनेक सोसायटीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी खाजगी टँकर वर अवलंबून राहावे लागत आहे.

24 ×7 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम होऊन देखील पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असल्याने पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कडून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. तसेच पाणी सोडणारे वॉलमन देखील योग्य रीतीने आणि सोडत नसल्याने नागरिकांना लागत आहे.

See also  चांदणी चौकातील कामाच्या गुणवत्ता व संपूर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे - खासदार सुप्रिया सुळे