गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रम संस्कार हिवाळी शिबीर लवार्डे येथे संपन्न

पुणे :गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रम संस्कार हिवाळी शिबीर लवार्डे येथे पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा प्राचार्य श्री डॉ संजय खरात व गावचे सरपंच मा सौ सुनंदाताई संभाजी चवले यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात सिंबाॅयसिस मेडिकल काॅलेज च्या सहयोगाने गावात. माउथ कँन्सर व सरव्हाईकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले व पोस्टर्स व बॅनर लावले. मेडिकल काॅलेजच्या डाँक्टरांनी कॅन्सर होऊ नये म्हणुन काय काळजी घ्यावी व उपाययोजने विषयी माहिती दिली. डाॅ राहुल मणियार समाजसेविका रेवती पाठक यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.
ग्राम स्वच्छता, मंदिराची रंगरंगोटी, शाळा रंगवणे, जलसंवर्धन, वृक्षारोपण व वेगवेगळ्या विषयांशी संबंधित सर्वेक्षण केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या विषयातील तज्ञ श्री केदार कदम व त्यांच्या समवेत श्री मोहसिन शेख हे उपस्थित होते . अनेक तज्ञ व्यक्तीनी शिबिराला भेट दिली.


शिबीरामुळे शाळा, मंदीर परिसर विद्यार्थ्यामुळे गजबजून गेला आहे. विद्यार्थ्यांनी गावात खुप छान काम केले आहे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग दर्शवला असे मत गावच्या सरपंच मा सौ सुनंदाताई चवले यांनी व्यक्त केले महिलांसाठी हळदीकुंकू व विविध अशा खेळांचे आयोजन करण्यात आले होते व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे हे शिबिर होते . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कार्यक्रम अधिकारी प्रा कुमोद सपकाळ, डाॅ मंजुषा कुलकर्णी डाॅ गोविंद कांबळे व महाविद्यालयीन इतर स्टाफ त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले .

See also  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त रितेश कुमार