पाषाण : पाषाण-सुतारवाडी-सुस रोड परिसरातील पाणी प्रश्नासाठी पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष श्री राहुल कोकाटे,श्री उत्तम जाधव यांनी पाणीपुरवठा विभाग व सामान पाणीपुरवठा विभाग (24×7) अधिकाऱ्यांसोबत पुणे महानगरपालिका येथे बैठक घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा सूचना दिल्या.व परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली.
सुतारवाडी गावठाण,शिवनगर,तापकीर चाळ,सुस रोड वरील विविध सोसायट्या,पाषाण गावठाण,एकता नगर येथील दैनंदिन पाणी पुरवठ्यातील त्रुटी अधिकाऱ्यांना सांगितल्या, लवकरच दोन्ही विभाग संबंधित परिसरात प्रत्यक्ष पाहणी करुन समस्या सोडवतील असे आश्वासन विभाग प्रमुख कार्यकारी अभियंता श्री एकनाथ गाडेकर व श्री भांगे यांनी दिले,यावेळी सहा.अभियंता श्री यलभर, श्री पाटिल,श्री व्यंकटेश,श्री प्रदीप रहांगडे उपस्थित होते.