काँग्रेसचे विश्रांतवाडी ब्लॉकचे अध्यक्ष विकास टिंगरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : काॅंग्रेसचे विश्रांतवाडी ब्लाॅकचे अध्यक्ष विकास टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. विकास टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.


पोरवाल रस्त्यावरील एका पंतसंस्थेच्या कार्यालयात मंगळवारी सांयकाळी गळफास घेऊन टिंगरे यांनी आत्महत्या केली आहे.
विकास टिंगरे विश्रांतवाडी ब्लॉक काॅंग्रेसचे अध्यक्ष आहेत. आत्महत्येचे नक्की कारण काय याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या घटनेची माहिती लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

See also  भुकूूम मठातील किर्तन महोत्सवला मोठा प्रतिसाद