९ ऑगस्ट क्रांती दिन स्वातंत्र्याच्या पर्वाचा एक ऐतिहासिक अध्याय – अरविंद शिंदे

पुणे : ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ‘‘ध्वजारोहण’’ करण्यात आले.

यावेळी बोलताना अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘९ ऑगस्ट क्रांती दिन स्वातंत्र्याच्या इतिहास पर्वातील एक ऐतिहासिक अध्याय आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीला उखडून टाकण्यासाठी आजच्या दिवशी ‘करो या मरो’ या घोषणेने ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरूवात केली.

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर भारतात संविधानाची वारंवार पायमल्ली होत आहे. शासनाच्या संस्थावर अनाधिकृतपणे दबाव टाकून वापर होत आहे. यासाठी खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य आणण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कटिबध्द व्‍हावे.’’

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, लता राजगुरू, रफिक शेख, मेहबुब नदाफ, राज अंबिके, प्राची दुधाने, प्रकाश पवार, द. स. पोळेकर, राजेंद्र पडवळ, आबा जगताप, नितीन परतानी, राजेश मोहिते, रवि ननावरे, रमेश सोनकांबळे, सिताराम चव्‍हाण, लतेंद्र भिंगारे, भगवान कडू, सचिन दुर्गोडे, देवीदास लोणकर, राज घेलोत, शालिनी शिंदे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

See also  ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाइन राज्यात सुरू