औंध मध्ये रामदेव ज्वेलर्स वर सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न एक जण गंभीर जखमी; हल्लेखोर गाडी सोडून पळाले

औंध : औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्स मधील रामदेव ज्वेलर्स वर सशस्त्र तीन हल्लेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला यामध्ये व्यापारी नेमा रामजी गंभीर जखमी झाले.

औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्स मध्ये सोन्या चांदीचे व्यापारी नेमा रामजी यांच्या रामदेव ज्वेलर्स दुकानावरती शुक्रवारी दुपारी 3:25 वाजता दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी ‌ दुकानांमध्ये प्रवेश करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तिघांकडे कोयता व तलवारी असल्याने नेमा रामजी यांनी हल्लेखोरांचा विरोध केला. यावेळी चोरीच्या तयारीत असलेल्या हल्लेखोरांवर विरोध झाल्याने हल्लेखोर पळू लागले यावेळी नेमा रामजी यांनी त्यांचा पाठलाग केला यावेळी हल्ले पोरांनी त्यांच्या वरती वार केले यामध्ये नेमारामजी गंभीर जखमी झाले.

रस्त्यावरती दुचाकी वर पळून जात असताना दुचाकी वर लाथ मारून दुचाकी पाडली यामुळे हल्लेखोरांनी दुचाकी सोडून विधाते वस्ती च्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने पळ काढला. 15 ऑगस्ट मुळे परिसरात गर्दी व फारशी वाहतूक नसल्याने हल्लेखोरांनी दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. दुपारच्या दरम्यान दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान औंध व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना वाळके यांनी तातडीने धाव घेत पोलिसांना झालेल्या घटनेची सूचना दिली व कारवाई करण्याची मागणी केली. विधाते वस्ती कडे पळून गेलेल्या हल्लेखोरांना शोधण्याचे काम पोलीस विभागाकडून तातडीने सुरू करण्यात आले आहे.

See also  मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू चौक येथे लाक्षणिक उपोषण तर औंध बाणेर बालेवाडी पाषाण परिसरात बंद