बालेवाडी : बालेवाडी येथील महामार्गालगत असलेल्या सर्विस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडे पडले असून काही ठिकाणी पाणी साठत असल्याने चारचाकी वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.
नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी पासून ते कावेरी हॉटेल कडे जाणाऱ्या सर्विस रस्त्यावर एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साठत असून महामार्गाला पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना जातो नाच वाहने चालवावी लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहनांचे नुकसान होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग व पुणे महानगरपालिका यांना वारंवार रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात मुख्यमंत्र्यांचा दौरा होऊन देखील या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. याबाबत नागरिकांमधून खेद व्यक्त केला जात आहे.
बाणेर बालेवाडी परिसरातील रस्त्यांमधील खड्डे मोजण्यात या वेत सर्विस रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.