“सोसायट्यांवरील लाखोंची पाणीपट्टी अन्यायकारक; नगरसेवक झाल्यावर पाणीपट्टी रद्द करणार” – माजी नगरसेवक तानाजी निम्हण

पाषाण : बाणेर–बालेवाडी– सुस– महाळुंगे परिसरातील नागरिक आणि गृहनिर्माण सोसायट्यांवर सध्या पाणीटंचाईचा मोठा आर्थिक बोजा पडत असल्याची तीव्र प्रतिक्रिया माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक कालावधीत पाषाण–सुस रोड परिसरात पालिकेमार्फत पाणीपुरवठा सुरू असतानाही नागरिक व सोसायट्यांवर लादण्यात आलेली पाणीपट्टी अन्यायकारक होती. त्या काळात हजारो-लाखो रुपयांची पाणीपट्टी माफ करून नागरिकांना दिलासा देण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

सध्या मात्र बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरात भीषण पाणीटंचाईमुळे अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असतानाच, पालिकेच्या पाण्याची बिलेही भरावी लागत असल्याने नागरिक दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ही परिस्थिती अत्यंत अन्यायकारक असून, नगरसेवक झाल्यानंतर यापूर्वी जशी पाणीपुरवठ्याशी संबंधित पाणीपट्टी रद्द करण्यात आली होती, तसाच निर्णय पुन्हा एकदा सोसायट्यांच्या हितासाठी घेतला जाईल, अशी ठाम ग्वाही तानाजी निम्हण यांनी दिली. पाणी ही मूलभूत गरज असून नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक भार पडू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे परिसरातील नागरिक आणि सोसायट्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ समस्या आणि विकासकामे मार्गी लावण्याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आयुक्तांसोबत बैठक