औंध परिहार चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

पुणे दि.८- केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे या कालावधीत आयोजन करण्यात आले असून औंध येथील नागरिकांना पीएम-स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड, आरोग्य तापसणी, आधार अपडेट, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आदी विविध योजनांचे लाभ देण्यात आले.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, माजी नगरसेवक सनी निम्हण, मधुकर मुसळे, गणेश बगाडे, किरण ओरसे, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सचिन मानवतकर, प्रकाश सोळंकी, अजय दुधाने, वसंत जुनवणे, अपर्णा कुराडे, सुचित गोटेकर, सौरभ कुंडलिक, अनिल भिसे, संकेत कांबळे, सागर मदने आदी उपस्थित होते.

विविध योजनांच्या लाभासाठी पात्र असलेल्या नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाकडून फिरता चित्ररथ उपलब्ध करून देण्यात आला. या रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी औंध परिसरातील नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला.

See also  पाषाणकर दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन