सुतारवाडी : सुतारवाडी पाषाण मराठा सहाय्यक समितीच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत. यासाठी सुतारवाडी ग्रामस्थांतर्फे गुळ व शेंगदाण्याची पाकिटे तयार करण्यात आली आहे.
आझाद मैदान मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना ही मदत पोहोचवण्यात येणार आहे. 2000 पाकीट तयार करण्यात आली आहेत. सुतारवाडी परिसरातील महिला व मराठा बांधवांनी मंदिरामध्ये मदत एकत्रित जमा करत पॅकेट तयार केले आहेत.
सुमारे 4000 मराठा बांधवांना गुळ शेंगदाणे पुरतील एवढे खाद्यपदार्थ पॅकेज तयार करून पाठवण्यात येणार आहे.