सुस. : सुसगाव येथे शिवछत्रपती मित्र मंडळ तापकीर वस्ती सुसगाव व श्री बाल मित्र मंडळ सुसगाव यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून मुंबई येथे संघर्ष करत असलेल्या मराठा बांधवांना मंडळाच्या वर्गणीतून मदत केली.
मुंबई येथे आझाद मैदानावर चालु असलेल्या आंदोलनातील मराठा बांधवाना खाद्य पदार्थ किंवा आवश्यक वस्तुचां पुरवठा करण्यासाठी आपल्या मंडळाच्या वतीने अनावश्यक खर्च कमी करून प्रत्येकी ५००० रु देऊन समाजापुढे एक आदर्श असं काम केल.त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा च्या समन्वयकांनी मंडाळातील कार्यकर्त्याचा सन्मान केला.
