संभाजी भिडे याच्या विरोधात पुणे न्यायालयात तक्रार दाखल

पुणे : पोलिसात तक्रार देऊनही कारवाई न केल्याने संभाजी भिडे यांच्या विरोधात आज महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि इतर सहकाऱ्यांनी पुणे न्यायालयात भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या महिन्यात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तुषार गांधी यांच्याकडे संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली होती. याचा वारंवार पाठपुरावा करूनही मात्र यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे अखेर तुषार गांधी यांनी न्यायालयाची पायरी चढली आहे.

संभाजी भिडे यांच्याबरोबरच पोलीस आयुक्तांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसावर दबाव आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. अडव्होकेटअसीम सरोदे यांच्या मार्फत ही तक्रार आज दाखल करण्यात आली आहे.

See also  पुणे शहर रुग्णसेवा समितीतर्फे दिंडीप्रमुखांना औषध पेटीचे वाटप