एक जून रोजी जयेश मुरकुटे फाउंडेशन व बीपीटीच्या वतीने तुकाई टेकडी स्वच्छता अभियान

बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तुकाई टेकडी स्वच्छता अभियान’ रविवारी एक जून रोजी सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

बाणेर परिसरातील तुकाई टेकडी ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण समजली जात असून अनेक देशी विदेशी जातींची झाडे या ठिकाणी वृक्षारोपण करून लावण्यात आले आहे.  परंतु सध्या अनेक ठिकाणी कचरा, प्लास्टिक, आणि घाण यामुळे तिचं सौंदर्य नष्ट होत आहे. यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने तुकाई माता मंदिर पॅन कार्ड रोड या ठिकाणी तुकाई टेकडी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. अशी माहिती कोथरूड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी दिली.

बाणेर टेकडीच्या संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी बाणेर बालेवाडी परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

See also  छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला