मुंढवा : केशवनगर मुंढवा भागातील गोदरेज इन्फिनिटी सोसायटी मधील कमिटीचा हिंदू देवतेची तोडफोड करण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. आठ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास सोसायटी मधील धर्मद्वेष्टूया समाजकंटकांनी सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेर्यांची दिशा बदलली. व सोसायटीच्या आवारात असलेल्या महादेवाचे शिवलिंगाला व समोरील नंदी महाराजांची मूर्ती तोडून काढण्यात आली. तोडल्यावर नदीत फेकून देण्यात आली. मंदिराच्या ठिकाणी कचरा टाकण्यात आला. स्वतःला आरएसएस चा कार्यकर्ता म्हणवणारा गोदरेज इन्फिनिटी सोसायटीचा कमिटी मेंबर व त्यांचे सहकारी यांनी हिंदू देवतेची विटंबना केली आहे, पोलीस प्रशासनाकडून मात्र अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात असल्याबाबत सोसायटी सदस्यांनी खंत व्यक्त केल्याने शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व गोष्टीची गंभीर दखल घेउन निषेध व्यक्त करत तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी सोसायटीतील रहिवासी, स्थानिक नागरिक, शिवभक्त व शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. समाजकंटक आरोपींवर गुन्हे दाखल करून लवकरात लवकर अटक करा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने व रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली.
शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनप्रसंगी उपशहरप्रमुख आबा निकम, सुरज मोराळे, विद्याताई होडे, अमृत पठारे, विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड, दिनेश निकम, शाखाप्रमुख अमर देशमुख, सोमनाथ गायकवाड, राहुल बायस, प्रवीण हिलगे, प्रवीण रणदिवे, अंकित अहिरे, ओमकार अवताडे, सुमित नवले, संदीप ढवळे, अभिषेक गावडे, बाळासाहेब सणस, देवेंद्र तमाईचीभाट, ओंकार बडगुजर, अक्षय बांगर, गणेश काळसइत, संतोष होडे, संतोष ढोरे, फय्याज जमादार, गोदरेज इन्फिनिटी सोसायटीच्या वतीने सुजित पवार, आशुतोष नारखेडे, वाहतूक सेनेचे दत्तात्रय घुले, राहुल शेडगे, नितीन निगडे, विजय पालवे, अमोल डोईफोडे, आशा भुजबळ, सुनिता मेटकरी, सुरेखा क्षीरसागर, वैशाली गायकवाड, मीना मगर, भाग्यश्री कांबळे, आदी उपस्थित होते.
























