“पुणे महिला मंडळ आणि संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिविकार तपासणी शिबिर”

पुणे : पुणे महिला मंडळ आणि संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिविकार तपासणी शिबिराचे आयोजन पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी केले.

या शिबिरात नामांकित डॉ. चेतन प्रधानसर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. डॉ आदिती मालपाणी, डौ.सिध्दार्थ कटकडे,डॉ. श्रध्दा प्रधान यांचा महत्वपूर्ण सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीन वर अनेक तपासणीमुळे शिबिर लाभार्थींनी अध्यक्षा सौ.केतकी कुलकर्णी यांना धन्यवाद दिले.डॉ चेतन प्रधान यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन शिबिराचा प्रारंभ झाला डॉ चेतन प्रधान यांनी आहारविहाराचे महत्व, हाडाचे ठिसूळतेचे कारण व उपाययोजना सांगितलं. डॉ श्रद्धा प्रधान यांनी कोणते व्यायाम कसे,कधी किती वेळा करावे याबाबत सांगितले या शिबिरात वयवर्षे 30ते 88 या वयोगटातील 255 स्री-पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला. अध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी यांनी 1927पासून महिला व बालकल्याण साठी कार्यरत असलेल्या पुणे महिला मंडळ, सामाजिक संस्थेचे कार्य आणि तेथील लेडीज हॉस्टेलबाबत सांगितले. अखिल भारतीय महिला परिषद नवी दिल्ली यांचेशी पुणे महिला मंडळ संलग्न असल्याचे सांगितले.

याशिबिरास
AIWC च्या member incharge डॉ आशाताई देशपांडे आवर्जून उपस्थित होत्या, त्यांनी सध्याच्या काळात या शिबिराची गरज आहे आणि हे शिबिर आयोजित केल्या बद्दल अध्यक्षा सौ. केतकी कुलकर्णी सर यांचे अभिनंदन केले. या शिबिर आयोजनात श्रीमती सुनिता प्रधान यांची मोलाची साथ लाभली. सूत्रसंचालन सेक्रेटरी वैशाली देशमुख यांनी केले. आणि सर्व डॉक्टरांचा परीचय एड. प्रिती मानकर यांनी करून दिला.शिबिरात सहभागी लोकांची नोंदणी एड. शैलजा केळकर, सौ पुष्पा कोळपे, सौ.स्मिता इनामदार, सौ.अर्चना कोकजे,सौ.ऋता वरधे,सौ.जयश्री घाटे यांनी केले. पुणे महिला मंडळाच्या कार्यकारिणीने सहकार्य केले. याशिबिरास मा.नगरसेवक जयंत भावे,सौ माधुरीताई सहस्रबुद्धे ,सौ अल्पना वरपे ,सौ स्मिता वस्ते, मंदार रेडे सौ.,सुजाता खटावकर,शशिकांत पदमवार,दतात्रेय देशपांडे, मकरंद माणकीकर,विवेक कुलकर्णी, रविंद्र मावडिकर,प्रणव देवधर, सौ.योगिता गोगावले, सौ.हर्षदा फरांदे, डॉ अरुण हुपरीकर, सौ साधना ओढेकर,सौ अनिता तलाठ, सौ.सुवर्णा काकडे, सौ शीतल गुंड यांनी शिबिरास भेट दिली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा महिला आघाडी, भारत विकास परिषद ,देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण संघ कोथरूड, व सहकार भारती यांचा सहभाग होता. पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. केतकी कुलकर्णी यांच्या कारकिर्दीतील मानाचा तुरा खोवणारे हे शिबिर आरोग्य धनसंपदाचा संदेश देत संपन्न झाले.

See also  सुखी जीवनासाठी प्रेमासोबतच जोडीदारांनी एकमेकांना सहकार्य करणेदेखील महत्वाचे - लीला पूनावाला