बाणेर : बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील नागरिकांसाठी नवरात्रीनिमित्त ‘नवरात्रीचे नवरंग’ फोटो स्पर्धेचे आयोजन कल्याणी टोकेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
उद्या २२ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या सणाच्या आनंदी वातावरणात नवरात्रीच्या दिवसात प्रत्येक दिवसाच्या रंगाप्रमाणे पोशाख सगळे घालतात. याचेच तुमचे एकट्याचे किंवा ग्रुपचे असे फोटो नागरिकांनी या 7499853905 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप वर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खालील विविध गटात बक्षिसे आहेत.
1) बेस्ट ड्रेस : पुरुष ५ बक्षिसे
२) best dress : महिला ५ बक्षिसे
३) best dress family : ५ बक्षिसे
४) best dress senior citizen : ५ बक्षिसे
५) best group photo: ५ बक्षिसे
या स्पर्धेमध्ये सोसायटी, तसेच महिला व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
घर ताज्या बातम्या बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील नागरिकांसाठी नवरात्रीनिमित्त ‘नवरात्रीचे नवरंग’ फोटो स्पर्धेचे आयोजन























