बाणेर मुख्य रस्त्यावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यावर कारवाई करावी जयेश मुरकुटे यांची मागणी

बाणेर : बाणेर येथील मुख्य रस्त्यावर श्री भैरवनाथ पादुका व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून मुख्य रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी केली आहे.

बाणेर मुख्य रस्त्यावर मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्ता अपुरा पडत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर राडाराडा टाकण्यात आला असल्याने याचा त्रास वाहन चालकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच पादचारी नागरिकांना देखील मुख्य रस्त्यावर चालावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

या परिसरातील राडारोडा कोणी टाकला आहे याची चौकशी करण्यात यावी तसेच यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जयेश मुरकुटे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  शहरांच्या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी सर्वसमावेशक पॉलिसी करण्याचे आश्वासन आमदार शिरोळे यांच्या लक्ष्यवेधीवर गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन