विंझर येथे न्यू इंग्लिश स्कूल मधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वह्या वाटप

वेल्हे : वेल्हा तालुका युवासेनेच्या वतीने विंझर येथिल न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर काॅलेज ऑफ आर्ट्स आणि काॅमर्स इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यी गुणगौरव व वह्या वाटप समारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख मुळशी पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी रा.स.पा.जिल्हा अध्यक्ष अतुल सुतार,युवासेना उपजिल्हाधिकारी दशरथ जाधव,भोर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश निगडे,वेल्हा तालुका युवासेना तालुकाधिकारी सुनिल शेंडकर,वेल्हा तालुका शिवसेना महिला संघटिका जयश्री शेंडकर,प्राचार्य भगवान बेल्हेकर, विझंर गावचे सरपंच राहुल सागर,विनोद गायकवाड,सुवर्णा भुरूक,विलास गायकवाड,जोतिबा पाडाळे,बाबासाहेब ससार, देवराज शेंडकर,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

See also  आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – पालकमंत्री दीपक केसरकर