कात्रज ऐश्वर्या कट्ट्यावर नामवंतांच्या अनुभवविश्वाने बहर

कात्रज : राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या अनुभवविश्वाने आजचा ऐश्वर्य कट्टा बहारदार रंगला.
आजचे कट्ट्याचे मानकरी होते, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आणि यशवंत अ‍ॅकेडमीचे संचालक शीतल पाटील.
गणेश सातपुते यांनी आपली लहानपणापासूनची वाटचाल उलगडताना राजकीय घडामोडींचादेखील वेध घेतला. त्यांच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेले लोकमान्य फेस्टिव्हल, पुणे कट्टा या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक मुलाने आपल्या पूर्ण नावामध्ये आईचेही नाव लावावे यासाठी हाती घेतलेल्या ‘मातृप्रथम’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. वारसाहक्काने आईवडिलांची मालमत्ता मुलांना मिळते तसा मुलांच्या उत्पन्नातील हक्काचा वाटा आई वडिलांनाही मिळावा यासाठी आता लढा देणे आवश्यक असल्याचे शितल पाटील यांनी सांगितले.
आपली कात्रजपासून झालेली जडणघडण आणि राजकारणातील वाटचाल नेमकेपणाने योगेश खैरे यांनी उलगडली.
बँकेचा साधा शिपाई ते बँकेचा अध्यक्ष ही संघर्षपूर्ण वाटचाल शिरीष मोहिते यांनी उलगडली. जिद्दीने केलेल्या वाटचालीतून शून्यातून सुरुवात करून आज त्यांच्या हाताखाली १२०० मुलं काम करीत असल्याचे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून अंध मुलांनासाठी, मातांसाठी राबवले जाणारे विधायक उपक्रम यांचाही आढावा त्यांनी घेतला. या चारही मान्यवरांकडून त्यांच्या जीवनातील वाटचालीची अनुभवांची श्रीमंती सर्वांनाच अनुभवायला मिळाली.


उपस्थित चारही मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मोत्याची माळ, शाल, शिंदेशाही पगडी आणि सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी १७ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा आपल्या प्रियदर्शनी शाळेचा विद्यार्थी असलेला धनराज शिर्के या युवा कुस्तीपटूला सन्मानित करण्यात आले. त्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने २१ हजार रुपयांचे बक्षीसही त्याला देण्यात आले.


या वेळी विलासराव भणगे, पराग पोतदार, रवींद्र संचेती, युवराज रेणुसे, अ‍ॅड. दिलीप जगताप, मधुकर कोंढरे, शंकरराव कडू, भरत शिर्के , संदीप फडके, विराज रेणुसे, अर्जुन शिर्के , संदीप भोसले , मंगेश साळुंखे, शिरीष चव्हाण, मनोज तोडकर व अप्पा रेणुसे मित्रपरिवार उपस्थित होता.

See also  सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट