बोपोडी : पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागामार्फत औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनाधिकृत फ्लेक्स वर कारवाई करत चार जाहिरातदारां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
उपायुक्त परवाना आकाशचिन्ह विभाग माधव जगताप यांच्या आदेशानुसार, परिमंडळ 2 उपायुक्त संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीष दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना निरीक्षक योगेश काकडे, परवाना निरीक्षक अमोल जोरे,परवाना निरीक्षक शरद हिले,संतोष कोळपे, चंद्रकांत भोसले व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी बोपोडी चौक, आंबेडकर चौक, याठिकाणी मोठया प्रमाणात पहाड मांडव यावर कारवाई केली. तसेच 4 जाहिरातदार यांवर गुन्हा नोंदविण्यात आले.