बालेवाडी: आम आदमी पार्टीच्या वतीने बालेवाडी मध्ये सर्व सामान्य नागरिकांसाठी चौकामध्ये नागरिकांचे प्रश्न ऐकण्या साठी खुल्या ऑफिस मध्ये रस्ता पाणी व ड्रेनेज आदी समस्या ठिकाणी व्यक्त केल्या.
यावेळी सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्या साठी या ऑफिसचा उपयोग केला जात असून नागरिकांवर कोणताही दबाव राहू नये तसेच पारदर्शकता विकास करताना असावी म्हणून खुले ऑफिस दर रविवारी साई चौकामध्ये भरवण्यात येत असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.
यावेळी आम आदमी पक्षामध्ये या आठवड्यात अनेक जणांनी जाहीर प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे नेते सुदर्शन जगदाळे व आबासाहेब कांबळेच्या उपस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्यात आला.