कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा टी-शर्ट मधील हटके यंग लुक

पुणे : खासदारांच्या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन च्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा टी-शर्ट मधील हटके यंग लुक समोर आला आहे. सहसा फुल बाह्यांचा पांढरा शर्ट व पॅन्ट असा साधा पोशाख चंद्रकांत दादांचा सातत्याने असतो. कधीतरी कार्यक्रमांच्या अनुषंगाने पेहराव मध्ये बदल पाहायला मिळतो.

मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मॅरेथॉन साठी आयोजकांनी तयार केलेला तीन रंगातील हाफ टी-शर्ट घातला होता. मॅरेथॉन स्पर्धेच्या सुरुवातीला झेंडा खासदार मुरलीधर मोहोळ व चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पर्धकांना झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी स्टेजवर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील स्पर्धेचा टी-शर्ट घातला होता परंतु त्यावर फुल बाह्यांचे ऑफ व्हाईट रंगाचे जॅकेट घातले होते. या स्पर्धेच्या दरम्यान व्यासपीठावर असलेल्या प्रमोद पाहुण्यांपैकी चंद्रकांत दादा एकटेच टी-शर्ट वर असल्याने स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांचा लूक अधिक उठून दिसत होता.

एरवी पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचे शर्ट अनेकदा हाताची बटणे न लावलेले साधी राहणे पसंत करणारे चंद्रकांत दादा मॅरेथॉनच्या निमित्ताने पहाटे हटके अंदाजामध्ये व्यासपीठावर आणि कॅमेरात देखील कैद झाले. दादांचा हा टी-शर्ट मधील लुक भविष्यातही अनेक कार्यक्रमांच्या व खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतो. पुण्यातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राचा वारसा जपणाऱ्या कोथरूड मतदार संघाच्या आमदारांचा ‘यंग लूक’ इतरही कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळणार का याबाबत मात्र आता काहीशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

See also  ... तर मोदींना घरी जावे लागेल - नाना पटोले