नदी पुनरूज्जीवन प्रकल्प करिता ‘एक्सपिरीयन्स सेंटर साठी’ पंडित भीमसेन जोशी कलादालनातील ‘आर्ट गॅलरी’ मुदत संपूनही बंद

पुणे : नदी पुनरूज्जीवन प्रकल्प करिता ‘एक्सपिरीयन्स सेंटर साठी’ औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनातील ‘आर्ट गॅलरी’ मुख्य अभियंता प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. यामुळे गेले दोन वर्ष आर्ट गॅलरीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन भरवले जात नसल्याने कला प्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी एक्सपिरीयन्स सेंटर म्हणून ताब्यात घेतलेली ‘आर्ट गॅलरी’मध्ये नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी कोणतेही कामकाज अद्याप पर्यंत झालेले नाही. गेले दोन वर्ष आर्ट गॅलरी बंद असून सांस्कृतिक विभागाकडून मागणी करूनही मुख्य अभियंता प्रकल्प कार्यालयाकडून आर्ट गॅलरी ताबा हस्तांतरित करण्यात आलेला नाही.

औंध येथील आर्ट गॅलरी प्रकल्पासाठी ३०जून २०२४ पर्यंत विनामूल्य वापरासाठी देण्यात आली होती. यानंतर देखील आर्ट गॅलरी सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरित केली नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना चित्रकला प्रदर्शनी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शने घेण्यास त्रास सहन करावा लागत आहे. मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमी नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. जैवविविधतेला धोका निर्माण करणारा हा प्रकल्प करण्यात येऊ नये अशी मागणी सातत्याने होत आहे. अशातच या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागाचे आर्ट गॅलरी गेले दोन वर्ष एक्सपिरीयन्स सेंटर च्या नावाखाली दोन वर्ष बंद अवस्थेत आहे.

औंध येथील आर्ट गॅलरी सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरित करून नागरिकांसाठी गॅलरी खुली करण्यात यावी अशी मागणी कलाप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.

ग्राफिटी एक्सप्रेशनचे संचालक विशाल शिंदे म्हणाले, गेले दोन वर्ष होऊन देतील आर्ट गॅलरी बंद आहे यामुळे चित्रकलेची प्रदर्शनी तसेच  सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शने या ठिकाणी भरवता येत नाहीत. आर्ट गॅलरी नदी प्रकल्पासाठी घेण्यात आली याचे कारण दाखवण्यात येत आहे प्रत्यक्षात या आर्ट गॅलरी चा वापर नदी प्रकल्पासाठी देखील झालेला नाही.

See also  शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे - रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट महायुती व घटक पक्ष कार्यकर्ते बैठक संपन्न