पहिल्या तीमाहित लाचखोरीचे प्रमाण 26 टक्के ने वाढले

पुणे : सन २०२३च्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात लाचखाेरीचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढल्याचे समाेर आले आहे. नागपूरमध्ये एक काेटी रुपयापर्यंत लाच मागितली गेली. या वर्षातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर संभाजीनगर मध्ये सरपंचाने पंचायती समिती समोर विहिरीसाठी लाच मागितल्याच्या प्रकरणी दोन लाख रुपये उधळलेची राज्यभर चर्चा झाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लाचखाेरांविरुद्ध कारवाई केली जाते. या सापळ्यांचे प्रमाण वाढले आहे, हे आकडेवारीवरून समाेर येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्यभरात सन २०२२ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत १७४ सापळ्यांमध्ये २२७ लाचखोरांना पकडले होते. यंदा सापळे आणि लाचखोर या दोन्ही संख्येत वाढ झाली आहे. चालू वर्षात २२० सापळ्यांमध्ये ३१३ लाचखोरांना अटक झाली.

सन २०२१मध्ये पहिल्या तीन महिन्यांत सापळे आणि अटक लाचखोरांची संख्या २११ आणि २८४ अशी होती. लाचखोरीच्या या तिमाहीतील सर्वांत मोठी रक्कम म्हणजे एक कोटी आहे. दोन महिलांनी केलेल्या तक्रारींवर आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू नये, यासाठी एक कोटी रुपयांची लाच नागपुरात मागण्यात आली. या लाचेचा २५ लाखांचा पहिला हप्ता घेताना ‘एमआयडीसी’चा अधिकारी आणि खासगी एजंटला अटक करण्यात आली.

पहिल्या तिमाहीतील आकडेवारी पाहिली, तर नाशिक विभाग लाचखोरीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. नाशिकने या वेळी पुण्याला मागे टाकले. पुण्यामध्ये ४३ सापळ्यांमध्ये ६१ जणांना अटक झाली, तर नाशिकमध्ये ४५ सापळ्यांमध्ये ७० लाचखोर अडकले आहेत. लाचखाेरीत महसूल विभाग राज्यात अव्वल आहे. महसूल ७८, पोलिस ३६, पंचायत समिती २७, नगर परिषद १९, विद्युत १८, महापालिका १६, अन्न व औषध प्रशासन १२, जिल्हा परिषदेतील ११ जण लाचखाेरीत पकडले गेले आहेत.

See also  बालभारती ते पौडफाटा रस्ता तसेच वनदेवी टेकडी वरील रस्त्याला विरोध -माजी आमदार मेधा कुलकर्णी