पुणे : इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडीया (ISB&M), पुणे तर्फे संस्थेचा वार्षिक भव्य परिषद ‘एचआर शेअर २०२५’ अत्यंत उत्साहात पार पडली . विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार आणि प्रा. राजू धर यांनी केले.
“Navigating the Future of Work: The Struggle for Space between Technology and People” या विषयावर आधारित या परिषदेत तंत्रज्ञान आणि मानव यांच्यातील नातेसंबंध, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आणि भविष्यातील कार्यपद्धती यावर सखोल चर्चा झाली.
या दोन दिवसीय परिषदेला ५०० हून अधिक प्रतिनिधी, १०० कॉर्पोरेट डेलीगेट्स आणि ५० पेक्षा अधिक कंपन्या देशभरातून सहभागी झाल्या. उद्घाटन सत्राला सीमेन्स हेल्थिनियर्सचे सीएचआरओ राहुल कुलकर्णी हे प्रमुख अतिथी, तर आदाणी रिअल्टीचे बिझनेस एचआर हेड श्रीकांत पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
आपल्या भाषणात राहुल कुलकर्णी म्हणाले, “हे तंत्रज्ञान विरुद्ध माणूस नाही — तर तंत्रज्ञानासह माणूस आहे. भविष्यातील यश हे दोघे कसे एकमेकांना पूरक ठरतात यावर अवलंबून असेल.”
तर श्रीकांत पवार म्हणाले, “आपण अशा काळात जगत आहोत जिथे माणूस आणि तंत्रज्ञान खरोखरच एकत्रितपणे प्रगती करतील.”
मुख्य वक्ते गॅब्रिएल इंडियाचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि सीएचआरओ विनोद रझदान तसेच आदित्य बिर्ला ग्रुप–हिंडाल्कोचे सीएचआरओ समित बसू यांनी तंत्रज्ञानाच्या युगातील मानवी संबंध, संस्थात्मक नेतृत्व आणि परिवर्तन व्यवस्थापनावर मोलाचे विचार मांडले.
या परिषदेत GAIL, ASSA ABLOY, ATOS, Boeing, Carrier, EY, Flipkart, IIFL Finance, ICICI Bank, Tata Motors, Nippon India Mutual Fund यांसारख्या नामांकित कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. झी एंटरटेनमेंटच्या दिव्या शुक्ला यांनी मीडिया उद्योगातील एचआरच्या बदलत्या भूमिकेबाबत विचार मांडत सर्जनशीलता आणि संघटनात्मक उत्कृष्टतेचा समतोल कसा साधावा, यावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी डॉ. प्रमोद कुमार, संस्थापक-अध्यक्ष, आयएसबीअँडएम म्हणाले,“भविष्य त्यांचं असेल जे तंत्रज्ञानासोबत राहायला शिकतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सतत शिक्षण आणि बदलांना स्वीकारण्याची वृत्ती हेच यशाचं रहस्य असेल.”























