पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनची पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक — गुन्हेगारी प्रकरणांवर तात्काळ पोलिस मदतीचे आश्वासन

पुणे :  पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री. अमानुल्ला खान आणि असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री. अमितेश कुमार यांची आज अत्यंत फलदायी भेट घेतली.

असोसिएशनने शहरातील काही पेट्रोल पंपांवरील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत व सुरक्षा चिंतेबाबत चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेत फक्त पाच मिनिटांत समस्या सोडवण्याची दिशा दाखवली. त्यांनी गुन्हेगारीने बाधित पेट्रोल पंपांना तात्काळ पोलिस मदत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

सीएनजीच्या कमतरतेमुळे काही पेट्रोल पंपांवर अत्यंत दबाव वाढला असून, प्रभावित पंपांची संपूर्ण यादी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे, असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अमानुल्ला खान यांनी तात्काळ प्रभावाने पंप बंद करण्याचा निर्णय मागे घेतला असल्याची माहिती देण्यात आली.

अली दारूवाला, प्रवक्ते, पुणे पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन म्हणाले, “पोलीस आयुक्त अमितेशजी कुमार यांनी त्वरित प्रतिसाद देत आमची समस्या हाताळली. त्यांच्या आश्वासनामुळे पेट्रोल पंपाची सुरक्षा आणि कामकाज सुरळीत राहण्यास मोठी मदत मिळणार आहे.”

See also  वारजे रामनगर भागात आमदार भीमराव तापकीर यांचा पदयात्रेत गाठीभेटी आणि संवादास उस्फूर्त प्रतिसाद