माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेस भवन पुणे येथे अभिवादन

पुणे : माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी येथे अभिवादन करण्यात आले  पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष  श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

जनसामान्यांच्या उन्नतीसाठी स्व.इंदिरा गांधी यांनी दुरदृष्टीने कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्या आजही उपयुक्त आहेत. देशाच्या विकासाला त्यांनी चालना दिली असे चव्हाण पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित जेष्ठ काँग्रेस नेते गोविंदराव मिरघे,किसान काँग्रेस अध्यक्ष शंकरराव दांगट,पर्यावरण काँग्रेस उपाध्यक्ष धनंजय पाटील, बारामती उपाध्यक्ष सुरेश मते, खडकवासला काँग्रेस उपाध्यक्ष संजय अभंग, खडकवासला काँग्रेस युवक अध्यक्ष विश्वजित जाधव,रघुनाथ यादव, नरसिंग आंदोली आदी उपस्थित होते.

See also  संपर्क संस्थेच्या बालग्रामला सर्वतोपरी मदत करणार - मा. आ. चंद्रकांतदादा पाटील