पुणे : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालयाने,पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय(स्वायत्त),
शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राती लमहाविद्यालयांच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या योगदानानिमित्त ‘संकटातून संकल्पाकडे’ या सन्मान सोहळयाचे आयोजन
करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.ना.श्री.चंद्रकांत (दादा)पाटील, मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य तर मा डाॅ सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे, मा डाॅ शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा प्रा डाॅ गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रो.ए.सोसायटी, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मेंटाॅर व मेंटीच्या या कार्याची सुरवात अवर्षणाचा फटका बसलेली महाविद्यालये व त्यांना मदत करणारी महाविद्यालये शोधून झाली. या वीस महाविद्यालयांनी त्या गावातील महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांना लागणार्या मदतीचा हात दिवाळीपुर्वी त्यांना पोहोचता केला. या कामात जी महाविद्यालये सहभागी होती त्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने व महाराष्ट्रगीताने झाली.
सत्कार करताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, “मराठवाड्यातील अर्वषणाच्या कठिण परिस्थितीत ज्या २० महाविद्यालयांनी मेंटर मेंटी या संकल्पनेचा अंतर्गत अतिशय मोलाची मदत केली ती उल्लेखनीय आहे. या कामाची सतत प्रेरणा मिळत रहावी म्हणून एका पुस्तकाचे आपण प्रकाशन करत आहोत. असेच काम राष्ट्रीय सेवा योजनेने सतत करत रहावे कारण समाजसेवा ही गरजेवर आधारित संवेदनशीलतेने करणे गरजेचे असते. नविन शैक्षणिक धोरणाचे हे उद्दिष्ट आपण साध्य करत आहोत. मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ मधे भारताचे ‘महागुरु’ बनण्याचे स्वप्न आपण साकार करत आहोत.”
भाषणात डाॅ एकबोटे म्हणाले,”उच्च शिक्षणामध्ये गेल्या काही दिवसात नविन कल्पना राबविल्या आहेत. तरीदेखील एन आर एफ रँकिग, उच्च शिक्षणामधे सीएस आर फंडिग मधून शिक्षक भरतीचे प्रयत्न व संशोधन निधी तरतुद झाल्यास निधीची त्रुटी भरून काढता येईल का याचा विचार व्हावा.” प्राचार्य डाॅ निवेदिता एकबोटे यांनी मराठवाड्यावर आलेल्या न भुतोना भविष्यति संकटात आम्ही खारीचा वाटा उचलेला आहे अशीच मदत हे महाविद्यालय सतत करेल असे आश्वासन दिले.या वेळी प्रा डाॅ प्रसन्न देशमुख यांच्या ई-काॅमर्स या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ वैजयंती जाधव यांनी केले. महाविद्यालयीन यादिचे वाचन डाॅ शांताश्री सेनगुप्ता यांनी केले.आभार प्रदर्शन डाॅ. अर्चना बोर्हाडे ( Borhade) यांनी केले.
डाॅ निवेदिता एकबोटे, प्राचार्या, माॅडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर व डाॅ अर्चना बोर्हाडे सहसंचलक (प्रशासन), उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.पी ई सोसायटीचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख, सहकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे, डाॅ प्रशांत मगर यांच्यासह उच्च शिक्षण संचलनातील सर्व माननीय,सत्कारार्थी महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी,या कार्यातील सर्व सहकारी, प्रो ए सोसायटीचे सर्व उपस्थित होते.
सत्कारार्थी महाविद्यालयाची नावे : मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे, एस. एम जोशी महाविद्यालय, हडपसर पुणे
अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर पुणे, बाबुराव घोलप महाविद्यालय, सांगवी पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, सर परशुराम महाविद्यालय पुणे, नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. न. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) संगमनेर, के. आर. टी. आर्टस्, बी. एम कॉमर्स आणि ए. एम. सायन्स महाविद्यालय, नाशिक, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), नाशिक
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, डी. के. ए. एस. सी. महाविद्यालय, इचलकरंजी, वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, लालबहादुर शास्त्री महाविद्यालय, सातारा, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड, नागिनदास खांडवाला कॉलेज, मालाड, मुंबई, साठ्ये महाविद्यालय विलेपार्ले, मुंबई, एस. आय. ई. एस. महाविद्यालय, (वेस्ट) मुंबई, एस. आय. ई. एस. सायन, (ईस्ट) मुंबई, नोलानी कॉलेज (स्वायत्त), अंधेरी (ईस्ट) मुंबई
























