भगवान महावीर जयंती (जन्मकल्याणक) निमित्त जैन विचार मंचच्यावतीने पुणे येथे आनंद यात्रा आयोजित

कोथरूड : भगवान महावीर जयंती (जन्मकल्याणक) निमित्त जैन विचार मंचच्यावतीने पुणे येथे आनंद यात्रा आयोजित करण्यात आली होती.

या यात्रेत तीन वर्षांच्या बालकापासून ऐंशी नव्वद वर्षांच्या जेष्ठ नागरिकांपर्यंत मातंगवंशातील लोक सामील झाले होते.भगवान महावीर यांची प्रतिमा रथात विराजमान करण्यात आली होती.भगवान महावीर यांच्या नावाचा जयजयकार यात्रेत करण्यात येत होता.ही यात्रा जैन विचार मंचचे निमंत्रक मा.विठ्ठल साठे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.

यात्रेत मा.शंकर वाघमारे,मा.राजेंद्र भोंडवे,
मा पांडुरंग दुबळे,मा.अर्जुन भोंडवे,मा.राजेंद्र अडागळे,मा.सनी भोंडवे, मा.शैलेश आवळे मा.दत्तात्रय भोंडवे , मा.दत्ता महापुरे , मा.शाहिर , मा.अँड. काळे , मा.संतोष भोंडवे , मा.शंकर लोखंडे , मा.शिवाजी वाघमारे , तसेच मा.गजानन (नाना)भेलके जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. जगन्नाथ कुलकर्णी मा.अध्यक्ष , कोथरुड विधान सभा (भाजपा) , मा.गिरिष भेलके सरचिटणीस , भाजपा कोथरुड विधान सभा . मा .सुजित मगर सामाजिक कार्येकर्ते मिरवणुकित सहभागी होते .
मिरवणुकिची सांगता लक्षीनगर , गुजरात काँलनी येथे करण्यात आली .

See also  पाषाण मध्ये कृष्णगंगा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन