बालभारती ते पौडफाटा रस्ता तसेच वनदेवी टेकडी वरील रस्त्याला विरोध -माजी आमदार मेधा कुलकर्णी

कोथरूड : बालभारती ते पौड फाटा रस्त्याची गरज नसून तो रस्ता वाहतुक सुरळीत करण्यासाठी उपयुक्त होणार नाही. तसेच यामुळे पर्यावरणाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे व यासाठी लागणारा खर्च देखील अवाढव्य असल्याची बाब माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत निदर्शनास आणून दिली.

यासाठी विविध ट्राफिक सर्वे करण्यात आले होते. यानुसार अनेक ट्राफिक सर्वे अहवाला मधील आकडेवारी नुसार फक्त १२ ते १५% वाहतूक या रस्त्याचा वापर करेल. हे अहवाल मनपाला देऊनही हे अहवाल पालिके कडून विचाराधीन घेण्यात आले नव्हते.

हा पूल जिथे उतरणार तिथे प्रचंड वाहतूक कोंडी होईल. टेकडी वर बांधकाम करताना ३ ते ४ हजार मोठी झाडे काढली जातील. आणि या सर्वातून नागरिकांना फारसा फायदा होणार नाही.
मनमानी पद्धतीने डिपीआर करणे , सल्लागार नेमणे, टेंडर काढणे कुठेही विकासाच्या नावाखाली पूल करणे चुकीचे आहे.
या साठीचा अवाढव्य खर्च 250/300 कोटी (125cr प्रति KM) हा नागरिकांच्या कराचा पैसा आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्वेरोडवर मेट्रो होत आहे. पुण्यात मेट्रो चे जाळे निर्माण करण्याची आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची संकल्पना आहे. मेट्रोची प्रवासी संख्या वाढावी म्हणून अगदी 4 एफएसआय चा निर्णय घेण्याइतकी भूमिका एकीकडे मनपा ने घेतली आहे. असे असताना उड्डाणपूल करून खाजगी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे काम होऊ नये. नळस्टॉप चौकामध्ये देखील उड्डाणपूल तयार करून पुढील चौकात वाहतूक कोंडी सरकवण्यात आली. असे चुकीचे निर्णय होऊ नयेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच वनदेवी टेकडी फोडून निरर्थक रस्ता करण्यासाठी सल्लागार नियुक्तकरण्यात येणार आहे.पुण्याची सहनशक्ती संपली आहे.
बीडीपी च्या 900 हेक्टर क्षेत्रापैकी फक्त सुमारे 300 हेक्टर शिल्लक आहे. बाकी सर्व टेकड्या क्षेत्र पुणे मनपा च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अतिक्रमणे होऊन संपल्या आहेत असे असताना रस्त्यांच्या नावाखाली टेकड्या उध्वस्त होण्याची कामे होऊ नयेत व या परिसरातील पर्यावरण हानी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी व पुणे शहरातील विविध पर्यावरण संस्थांच्या प्रतिनिधींनी केली.

See also  परदेशात फिरायला पंतप्रधानांना वेळ आहे, पण जळणाऱ्या मणिपूरसाठी वेळ नाही -इंडिया फ्रंट, पुणे चा सवाल