लक्ष्मीबाई वाडेकर यांचे निधन

पुणे : शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांच्या मातोश्री व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या लक्ष्मीबाई बाळकृष्ण वाडेकर यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  त्या ८७ वर्षांच्या होत्या.

पुण्याच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर आणि हवेली तालुक्याच्या मंडलाधिकारी वर्षा आप्पासाहेब वाडेकर यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना – नातवंडे असा परिवार आहे.  लक्ष्मीबाई वाडेकर या मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि इंदू मिल यासह विविध सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभागी होत्या.

See also  जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने रस्त्याचे रुंदीकरण