पुणे : पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आता कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करत सज्जतेचा आढावा घेतला.
उपलब्ध असलेल्या सर्व बाबींची मोहोळ यांनी बारकाईने माहिती घेतली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि पुण्याचे खासदार असलेले मुरलीधर मोहोळ यांनी हे टर्मिनल सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफ जवानांच्या उपलब्धतेसह विविध तांत्रिक प्रक्रिया मोहोळ यांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण केली. टर्मिनल सुरु करण्याची सर्व प्रक्रिया आता जवळपास संपली असून येत्या रविवारी दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु होतंय. नव्या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. सुसज्ज व्यवस्था ६ बोर्डिंग गेट आणि एकाचवेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळतेय