बाणेर : बाणेर मध्ये “कीर्तीशक्ती फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघ चालक रवींद्र वंजारवडकर, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, बाणेर मेडिकल असोसिएशन चे प्रमुख प्रसिद्ध डॉ राजेश देशपांडे उपस्थित होते.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी कोथरूड अध्यक्ष श्री प्रकाश बालवडकर, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, काँग्रेस पक्षाचे जीवन चाकणकर, श्री अमरजी लोंढे, श्री राहुल बालवडकर , सौ ज्योती बालवडकर, श्री विशाल विधाते, भाजप चे कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, विशाल गांधीले, प्रकाश तापकीर, संतोष तापकीर, शिवम बालवडकर, राहुल कोकाटे, उत्तम जाधव, सुभाष भोळ, गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर , श्री ओंकार शेडजाळे, डॉ मनिषा जाधव, बाबुराव चांदेरे, योगीराज पतसंस्थेचे श्री ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे श्री जयेश मुरकुटे उपस्थित होते
यावेळी संस्थेचे संस्थापक सौ कल्याणी टोकेकर, श्री ब्रिजेश राय आणि सौ शिखा नीखरा यांनी संस्थेच्या कार्य उद्देशांची माहिती उपस्थितांना दिली.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप पदाधिकारी सौ कल्याणी टोकेकर यांनी वाढदिवसानिमित्त “धान्य संकलन: गरजू विद्यार्थ्यांसाठी” हा उपक्रम आयोजित केला. गरजू विद्यार्थ्यांना सांभाळणाऱ्या सेवाभावी संस्थांना लोकसहभागातून धान्य जमा करून मदत करण्याच्या या उपक्रमाची प्रशंसा बाणेर बालेवाडी पाषाण भागातील नागरिकांनी केली आणि स्वयंस्फूर्तीने धान्य दान केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे सेवाभावी संस्थांचे एकत्रीकरण होते आणि त्यांची माहिती लोकांपर्यंत होते, अशा स्तुत्य उपक्रमाचा वाढदिवसानिमित्त विचार केला ह्याबद्दल त्यांचे मान्यवरांनी कौतुक केले.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, कल्याणी यांचे सामाजिक कार्य तळागाळात आहे आणि विविध खेळ स्पर्धा यशस्वीपणे त्या आयोजित करतात. राजकारण आणि समाजकारणात सक्रिय पणे काम करणाऱ्या व्यक्तीला बरेचदा खूप संघर्षाचा सामना करावा लागतो, पण त्यातूनच आपण घडत असतो, पुढे जातो.
या कार्यक्रमास विविध स्तरातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यापीठ भागाचे संघ कार्यवाह, सहकार्यवाह, स्वयंसेवक आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते.
.
























