बालेवाडी : अमोल बालवडकर मित्र परिवाराच्यावतीने येत्या रविवारी 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील हायस्ट्रीट मैदान येथे भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मित्रपरिवार, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच नागरिकांना एकत्र आणून आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या स्नेहमेळाव्यात सामाजिक बांधिलकी, परस्पर संवाद आणि एकोप्याचा संदेश देण्यात येणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. परिसरातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम एक सकारात्मक संवादाचा मंच ठरणार आहे. या स्नेहमेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सामाजिक सलोखा व मैत्रीचे नाते अधिक बळकट करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






















