“औंधच्या विकासाची सूत्रे पुन्हा गायकवाडांकडे?”

औंध  :औंध परिसराच्या सर्वांगीण विकासाला नव्याने गती देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी प्रभागा मध्ये भारतीय जनता पक्षाकडून माजी महापौर दत्तात्रय गायकवाड व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यांच्या या घोषणेमुळे औंध व परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

माजी महापौर म्हणून कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी काम केल्याची दत्तात्रय गायकवाड यांची ओळख आहे. औंध परिसरात वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, नागरी सुविधा आणि पर्यावरणीय प्रश्न लक्षात घेता, नियोजनबद्ध विकासाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.१९९२ ते २०१७ काळामध्ये दत्तात्रय गायकवाड व त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड यांनी परिसरामध्ये सलग २५ वर्षे नगरसेवक पद भूषवले व औंध परिसराचा स्मार्ट विकास केला. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये प्राधान्याने औंध परिसराचा समावेश करण्यात आला.

१९९२ ते २०१७ काळामध्ये दत्तात्रय गायकवाड व त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड यांनी परिसरामध्ये सलग २५ वर्षे नगरसेवक पद भूषवले व औंध परिसराचा स्मार्ट विकास केला. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये प्राधान्याने औंध परिसराचा समावेश करण्यात आला.“औंधचा संतुलित व शाश्वत विकास हेच माझे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.

“औंधचा संतुलित व शाश्वत विकास हेच माझे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.त्यांच्या पुनरागमनामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येत्या निवडणुकीत औंध बोपोडी प्रभाग मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

See also  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या‘सत्यमेव जयते फार्मर कप’ पुरस्कारांचे वितरणगटशेतीला आंदोलनाचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने राज्यात गटशेतीचे नवीन धोरण आणू- मुख्यमंत्री

त्यांच्या पुनरागमनामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येत्या निवडणुकीत औंध बोपोडी प्रभाग मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.