पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ सुस–बाणेर–पाषाण परिसरात काँग्रेस पक्षाचा प्रचार वेग घेत आहे. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जीवन चाकणकर हे प्रचारात आघाडीवर असून मतदारांशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका आणि विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडत आहेत.
या प्रचार मोहिमेत महिला भगिनींचाही मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. वृषाली चाकणकर, ज्योती चांदेरे, वर्षा मुरकुटे, कादंबरी लोंढे, निशाताई काटकर, सीमाताई मुरकुटे, त्रिवेणी ताई माने यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी आणि परिसराच्या विकासाबाबत महिलांनी नागरिकांचे मत जाणून घेतले.
घरभेटी दरम्यान काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि आगामी काळातील विकासात्मक आराखड्यावर भर देण्यात आला. महिलांनी केलेल्या या संवादात्मक प्रचारामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस पक्षाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक नऊमध्ये काँग्रेसचा प्रचार अधिक व्यापक आणि संघटित पद्धतीने सुरू असून येत्या काळात प्रचाराची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
























